स्री संयमशिल अशी एक वेल आहे जी जन्मल्यापासून तर मृत्यूपर्यंत बहरत असते… स्रीयांची वेदना सहन करण्याची क्षमता अद्वितीय आहे, तिच्या आयुष्यात दुःख असल तरी ती तिच अस्तित्व हास्य रुपी ठेवत असते जे इतरांसाठी प्रेरणास्थान ठरते… तिच्या आयुष्यात ती आजी, पत्नी, नात, आई, बहीण, मुलगी, नात, मैत्रिण अश्या अनेक भूमिका पार पडतांना सहन करत असते.. तिच्या चेहऱ्यावर आनंद ठेवून अंतर मनात दुःख दडून ठेवते, आणि प्रत्येक नात ती मनापासून प्रेमाने निभवत असते.. तिच्या डोळ्यात नेहमी एक जिवंत दुःख पाहायला मिळते.. तितिक्षा हा एक गुण प्रत्येक स्री मध्ये आढळून येतो जो तिला देवाने दिलेले एक वरदान स्वरूपात ठरतो.. ती नेहमीचं सुंदर जिवन जगण्यासाठी धडपड करत असते आणि प्रत्येकाला मदतीसाठी हातभर लावत असते..